अकोला विभाग प्रतिनिधी:- इम्रान खान सरफराज खान
अकोट दिनांक १२.०३.२०२५ रोजी येथील वि. अतिरिक्त
जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. बी.एम. पाटील यांनी वनन्विभाग वनपरिक्षेत्र उपविभाग, अकोला यांचे फाईल वरील अपराध क्र. ०१२७७/०१ दि. २७.०१.२०२५ वन्यजीव (संरक्षण कायदा) १९७२ चे कलम ३९,४० (२),४४(अ) (१), ४८ (अ),४९,५०,५१ कायद्यामधील आरोपी केशव माधव भिवगडे, वय ३८ वर्ष, राहणार आष्टी ता. आष्टी जि. वर्धा, मोहन पुंडलिकराव मनोहरे, वय ४० वर्ष, राहणार टुमनी ता. आष्टी जि. वर्धा यांनी तालुका आष्टी जि. वर्धा यातील जंगलाला लागून असलेल्या शेतात २ कोटी रूपयास वन्यप्राणी जिवंत खवले मांजर १३.५० किलो विक्री करतांना रंगेहात पकडल्या गेल्याचे प्रकरणात दाखल केलेला जमानत अर्ज वि. अकोट सत्र न्यायालयाने नामंजूर केला आहे. वरील दोन्ही आरोपी दिनांक ०७.०२.२०२५ पासून अकोला कारागृहात बंदीस्त आहे.
या प्रकरणात सरकार तर्फे सरकारी वकील श्री. अजित देशमुख यांनी जमानत अर्जाला विरोध करतांना न्यायालयात लेखी उत्तर व युक्तीवाद सादर केला की, अकोला येथील वनपरिक्षेत्र अधिकारी व्हि.आर. थोरात यांच्या फिर्यादीवरून वरील प्रमाणे एकूण ८ आरोपीविरूध्द हा गुन्हा दाखल करण्यात आला. वनपरीक्षेत्र अकोला अंतर्गत अकोट वर्तुळ येथे दिनांक २७.०१.२०२५ रोजी मिळालेल्या गुप्तमाहितीवरून वन्यप्राणी बिबटची कातडी अवैधपणे विकी करित असतांना जप्त करण्यात आली.
व त्यानुसार वन गुन्हा क. ०१२७७/०१ वरील कलमांप्रमाणे दि. २७.०१.२०२५ रोजी दाखल करून या प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेण्यात आले. सदर गुन्हयात ताब्यात असलेला आरोपी नामे राजकुमार सिकची रा. नयाप्रेस अकोट जि. अकोला याच्या चौकशी दरम्यान वन्यप्राणी बिबट व इतर प्राण्यांचे अवयव विक्री करणारी एकच टोळी संपूर्ण महाराष्ट्र भर सकीय असून, ही टोळी वन्य प्राण्यांच्या विक्रीचा व्यवहार करणार असल्याची माहिती मिळाली. तेव्हा वन विभागाने आशिष या नावाने बनावट खरेदीदार म्हणून सापळा रचून दिनांक ०३.०२.२०२५ रोजी व्यवहाराचा दिवस ठरला. त्यानुसार वनविभागाचे पथक मागावरचं होते. परंतू, विक्री करणारे आरोपी हे तासा तासाने व्यवहाराची जागा बदलत होते. आणि शेवटी आष्टी तालुका जि. वर्धा येथील जंगलाला लागून असलेल्या शेतात २ कोटी रूपयास खवले मांजर विक्री करण्याचे ठरले. व व्यवहार होत असतांना. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जिवंत खवले मांजर १३.५० किलो व चार आरोपी रंगेहात पकडले. आरोपींकडून एकूण चार मोबाईल फोन, एक लेदरपर्स इत्यादी साहित्य जप्त करून, आरोपींना वरील गुन्हयामध्ये अटक करण्यात आली. वनविभाग अकोला तर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी वि. न्यायालयात युक्तीवाद केला की अकोट येथील वन्यप्राणी बिबट्याच्या कातडीची तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपी राजकुमार सिकची तसेच दिनांक ०३.०२.२०२५ रोजी वन्यप्राणी खवले मांजर शिकार यातील मुख्यआरोपी किसनराव गायकवाड या दोघांशी वरील दोन्ही आरोपी केशव भिवगडे व मोहन मनोहरे हे या दोघांच्या संपर्कात होते. दि. ०३.०२.२०२५ रोजी खवले मांजर शिकार प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर त्या तिघांनी वन्यप्राणी खवले मांजर, मांडूळ साफ, कासव यांची तस्करी केल्याचे मान्य केले आहे. या गुन्हयातील आरोपी राजकुमार सिकची, मोहन मनोहरे, किसनराव गायकवाड, सुनिल पवार, केशव भिवगडे यासर्व आरोपीचे वन अधिकाऱ्यांनी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ५० प्रमाणे जो कबुली जबाब नोंदविला त्यामध्ये या आरोपींनी खवले मांजरची तस्करी केल्याचे मान्य केले व या प्रकरणातील परराज्यातील मुख्य फरार आरोपी नामे लक्कीसिंग उर्फ बालकदास महाराज याच्याशी देखील काही आरोपींचा संपर्क होता. हे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे जोपर्यंत हा मुख्य आरोपी वनविभागाच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत या आरोपीना जामीनावर सोडण्यात येवू नये. या प्रकरणातील आरोपी वन्यप्राण्यांची तस्करी करणाऱ्या टोळींचे असून, ही टोळी आंतरराजीय स्तरावर सकीय असून यांचे जाळे राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात राज्यात पसरलेले आहेत. या आरोपींना आमीनावर सोडल्यास ते इतर टोळीतील आरोपींना मदत करून ते आरोपी फरार होण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये काही दिवसापूर्वी केलेल्या कार्यवाहीमध्ये आरोपीचे संबंध नेपाळ मार्गे परराष्ट्र चीन पर्यंत आढळून आले आहे. त्यामुळे या गुन्हयामध्ये वन्यप्राण्यांची तस्करी झाली असून, या गुन्हह्नो सुध्दा धागेदोरे नेपाळ मार्गे परराष्ट्र चीन पर्यंत असल्याचीनेपाळ मार्गे परराष्ट्र चीन पर्यंत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या गुन्हयाचा संपूर्ण उलगडा अजून झालेला नाही. हा गुन्हा अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे. या आरोपींचा जामीन मंजूर झाल्यास फरार आरोपी लक्कीसिंग उर्फ बालकदास महाराज याचा शोध घेणे शक्य होणार नाही व तपास कार्यात अडथळा निर्माण होईल. या आरोपींचे मनोबल वाढवून त्यांना वन कायद्याचा धाक राहणार नाही व पुन्हा अशाच प्रकारचे गुन्हे करून यांच्यामुळे वनसंपत्तीला धोका निर्माण होवू शकतो. त्यांचबरोबर जनसामान्यांमध्ये वन्यप्राण्यांच्या संरक्षणाबाबत चुकीचा संदेश जावू शकतो. त्यामुळे वरील दोन्ही आरोपींना या गंभीर प्रकरणात कारागृहातचं ठेवावे कारण या प्रकरणाचा तपास सहायक वनसंरक्षक श्री. एस. के. खूने हे करित असून, तपास अजून पूर्ण झालेला नाही. या गुन्हयाची महत्वाची माहिती फरार आरोपी यांना ताब्यात घेतल्यानंतर चौकशीमध्ये समोर येईल. त्याकरिता या आरोपीचा जमानत अर्ज नामंजूर करण्यात यावा व त्याला कारागृहातच बंदीस्त ठेवावे असा युक्तीवाद वनविभागातर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी केला व दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर वि, न्यायालयाने दोन्ही आरोपींचा जमानत अर्ज नामंजूर केला.

