गणेश राठोड:-जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
फूलसांवगी: होळी म्हणजे रंगांचा, उत्साहाचा आणि एकात्मतेचा सण. मात्र, सण साजरा करताना निसर्गपूरक पद्धतींचा अवलंब करणे गरजेचे आहे. यासाठी फुलसावंगी येथील सरकारमान्य रुद्राक्ष कॉम्प्युटरचे संचालक योगेश राठोड सर यांनी विद्यार्थ्यांना इको-फ्रेंडली होळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे.
होळीच्या निमित्ताने पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी वृक्ष पूजन आणि वृक्षारोपण करण्याचा संकल्प योगेश राठोड सर यांनी विद्यार्थ्यांसमोर ठेवला. दरवर्षी मोठ्या प्रमाणावर लाकूड जाळल्याने वृक्षतोड वाढते आणि पर्यावरणाचे नुकसान होते. ही हानी टाळण्यासाठी पर्यावरणपूरक उपाय अवलंबणे गरजेचे आहे.
रुद्राक्ष कॉम्प्युटर सेंटरमध्ये विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शनपर सत्र आयोजित करण्यात आले होते. या वेळी विद्यार्थ्यांना होळीचा पारंपरिक आणि वैज्ञानिक महत्त्व पटवून देताच, पाण्याच्या बचतीचे आणि नैसर्गिक रंगांच्या वापराचे महत्त्वही समजावून सांगण्यात आले.
योगेश राठोड सर म्हणाले, “होळीच्या दिवशी एक झाड लावा आणि वृक्ष पूजन करा. यामुळे केवळ निसर्गाचे संरक्षणच होणार नाही, तर पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले जाईल.”
विद्यार्थ्यांनी या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून होळी निमित्त एक झाड लावण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे समाजात पर्यावरण जागृती आणि संवर्धनाचा संदेश पोहोचणार आहे

