परभणी विभाग प्रतिनीधी: – प्रल्हाद निर्मल परभणी जिल्ह्यात 2014व 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा 2024 ला झालेल्या मतदानात मतदानाचा टक्का वाढला आहे,2019 मधील विधानसभा निवडणुकीत 67,83% मतदान झाल, तर 2024 मध्ये 71,45%मतदान झाले आहे .परभणी जिल्ह्य़ातील चार मतदारसंघात यंदा मतदानाची टक्केवारी वाढली आहे,जिल्ह्यात एकूण 15 लाख 53हजार369 मतदार संख्या आहे त्यात 8लाख 235 पुरुष तर7 लाख 53हजार106 महिला मतदार आहेत इतर 28 मतदार आहेत, त्या पैकी 5लाख83हजार 845 पुरुष मतदारानी तर 5 लाख 26 हजार 7 महिला मतदारानी त्याच्या मतदानाचा हक्क बजावला.जिल्हा निवडणूक विभागाने मतदानाचा टक्का वाढविण्या साठी गेल्या महिन्यापासून जनजागृती केली होती. त्याचा चांगला परीणाम या निवडणुकीत दिसून आला आहे, झालेल्या निवडणुकीत पुरुष मतदाराची टक्केवारी 72,96% इतकी आहे तर महिला मतदाराची टक्केवारी 69,85% इतकी आहे. मतदार संघ निहाय टक्केवारी जिंतूर 75,36 परभणी 65,73. गंगाखेड 73,04 पाथरी 70,97 अशी आहे…...


