गणेश राठोड
तालुका प्रतिनिधी उमरखेड
तारीख २२/११/२०२४
महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे तिवंरग येथील शेतकऱ्यांचा ऊस शॉर्टसर्कीटमुळे आगीत भस्मसात झाला असुन अगोदरच प्रचंड अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावाले आहे. शुक्रवार (दि. २२/१०/२४ ) दुपारी अचानक हवेचा वेग वाढला व शेतातून गेलेल्या विजेचा तारांचे एकमेकांना घर्षण झाले यात पार्किंग होऊन तोडणीला आलेल्या ऊसाने पेट घेतला. यामध्ये दिड एकर ऊस जळून खाक झाला.
तिवरंग ता.उमरखेड येथील शेतकरी गजानन केशवराव कदम शेत सर्व्हे.४६)१ मधील व तानाजी उत्तमराव कदम रा तिव रंग ह्या शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस जळुन खाक झाला महावितरणच्या बोगस लाईन मुळे जळाला या क्षेत्रातील ४० आर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी गेला.
ऑक्टोबर महीन्यात लागवड केलेला ऊस तोडणीच्या तोंडावर जळाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
तिवरंग शिवारातील येथील महावितरण यंत्रणा ही जीर्ण झालेली असून, दरवर्षी
ठेकेदाराच्या नावाने दुरुस्तीच्या कामाची बिले काढून मोठ्या प्रमाणात भष्टाचार करणारे अधिकारी व लाईनमन शेतकऱ्यांच्या तक्रारीची कधीच दाखल घेत नाहीत. ग्रामीण भागातील शेतीविजकडे यांचे विशेष दुर्लक्ष या संदर्भात पावसाळ्या पूर्वी महावितरणला कळवून देखील थातूर मातुर दुरूस्ती केल्यामुळे शेतकऱ्यावर आज हे संकट आले यामुळे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांची देखील चौकशी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीची त्यांच्या कडून वसुली करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
शेतकऱ्यांचा ऊस किती दिवसात त नेते याकडे आपन ग्रस्त शेतकऱ्यांचे लागले आहे. ऑक्टोबर महिन्या लागवड असात्यामुळे ऊस वजनदार व उतारा देखील जास्त येतो. जळाल्यामुळे त्याच्या वजनात घट तसेच कारखाना देखील त्यामध्ये क करतो. त्यामुळे दोन्ही बाजुने शेतकरी वर्गाचे नुकसान होत आहे.


