गणेश राठोड
तालुका प्रतिनिधी उमरखेड
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काल (२० नोव्हेंबर) पार पडले. या निवडणुकीत महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान पार पडले. यात यवतमाळ जिल्ह्यात सरासरी 61.22 टक्के मतदान झाल्याची माहिती आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदा मतदानाचा टक्का वाढला आहे. यात उमरखेड मध्ये67.90% झालं आहे. उमरखेड मध्ये निवडणूक अगोदर चौरंगी लढत असल्याचे चित्र असताना २० नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडी आणि महायुती यामध्ये टक्कर असल्याचे चित्र दिसले. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार विजय राव खडसे आणि मनसे चे राजू नजरधने टक्कर देतील असे चित्र असताना कालच्या निवडणुकीत मतदाराचा कॉल पक्षा सोबत दिसला यात मेन फॅक्टर महायुती कडून बटेंगे तो कटेंगे च्या स्लोगनने काही समाज वर भीतीचा प्रभाव पाडल्यामुळे त्यांनी संविधान वर विश्वास न ठेवता विकास करणाऱ्या उमेदवाराला डावलून महायुती कडे वळल्याची तर काही समाज महायुतीच्या जाती पातीच्या राजकारणाला कंटाळून महाविकास आघाडी कडे वळल्याची चर्चा आहे . तर मतदानानंतर लगेचच एक्झिट पोल्सचे अंदाज समोर आले असता . अनेक एक्झिट पोल्सनी महायुतीला बहुमत प्राप्त होईल, असा अंदाज वर्तविला असला तरी उमरखेड महागाव विधानसभा मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार साहेबराव कांबळे ची सीट येणार असल्याची जनतेतून प्रतिक्रियाही समोर येत आहेत. असे असतानी महाविकास आघाडी व महायुती कडून निकालाच्या दिवसाची वाट पाहू, अशी प्रतिक्रिया दिली जात आहे.


