वर्धा प्रतिनिधी:- शहरातील सराफा बाजारपरिसरात असलेल्या मनोहर तुकाराम ढोमणे या सराफा दुकानात नवी दिल्ली येथील रहिवासी बंटी-बबलीसह इतर एकाने प्रवेश करून दुकानात असलेल्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांवर मिरची स्प्रे मारून सशस्त्र धुमाकूळ घालत दुकान लुटण्याचा प्रयत्न केला. ही घटना भरदुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने बाजार परिसरात एकच तारांबळ उडाली होती. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. आर्या सुनील कुमार वशिष्ठ (१८, रा. नवी दिल्ली) आणि १७ वर्षीय आलिझा नामक तरुणी, अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.1शहरात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटना वाढल्या आहेत. सराफा मार्केटमधून अनेकांच्या पर्स, पाकिटे तसेच दागिने चोरीच्या घटनाही घडलेल्या आहेत. अशातच गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास मनोहर तुकाराम ढोमणे यांच्या सराफा दुकानात दोन तरुणी आणि एक तरुण हे शस्त्रानिशी शिरले. तरुणीने जवळील मिरची स्प्रे काढून दुकानात असलेल्या तीन ते चार कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांवर मारले. तसेच काही कर्मचाऱ्यांवर शस्त्रानेही वार केल्याची माहिती आहे. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत असल्याने तत्काळ इतर कर्मचाऱ्यांनी धाव घेत चोरट्यांना पकडले. एक जण पळून गेला तर दोघांना पकडण्यात यश आले. चोरट्यांना पकडून नागरिकांनी चांगलाच चोप दिला. सुदैवाने कुठलेही दागिने वा रक्कम चोरी झाली नाही. तत्काळ शहर पोलिस ठाण्यातील कर्मचारी आणी स्थनिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळ गाठून,आरोपींन पोलिसात नेत गुन्हा दाखल केला.


