अकोला विभाग प्रतिनिधि गणेश वाडेकर
- जिल्हाधिकाऱ्यामार्फत पंतप्रधान मुख्यमंत्री यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर.
अकोला…
अकोला जिल्हा अखंड गरजवंत मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक ११/ मार्च 2025 मंगळवारला एकदिवसीय आत्मक्लेष धरणा सत्याग्रह आंदोलन दहा ते पाच या वेळात करण्यात आले . तसेच जिल्हाधिकारी अकोला यांच्यामार्फत प्रांतप्रधान व मुख्यमंत्री यांना विविध मागण्यांचे निवेदन देऊन त्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली .या मध्ये मस्साजोग येथील सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी म्हणून ही केस जलद गती न्यायालयात चालवण्यात यावी तसेच धनंजय मुंडे यांना सह आरोपी करून त्यांच्यावर 302 चां गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यांची आमदारकी रद्द करून त्यांना अटक करण्यात यावी.

