- अनिसचे कार्यकर्ते होळीत टाकली जाणारी पुरणपोळी,गाठी जमा करून गरजूंना वाटणार,गेली २५ वर्षांपासून करतात प्रबोधनासह उपक्रम….
- रूढी परंपरा कर्मकांडाला विरोध न करता देतात पर्यावरणीय पर्याय…,रासायनिक रंग वापरून व दारू पिऊन रंगपंचमी साजरी करू नका…
होळी व रंगपंचमी हा सण सर्वच भारतीय आनंदाने, उत्साहात साजरा करतात मात्र हा सण साजरा करताना लाकडे जाळून व रंगपंचमीच्या दिवशी औद्योगिक वापरासाठी उपयोगात आणल्या जाणा-या रासायनिक रंगाचा वापर एकमेकांना तोंडाला लावण्यासाठी केला जातो तो नंतर रंग काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय केला जातो दिवसेनदिवस पाण्याचा साठा कमी होत आहे त्याऐवजी पर्यावरणपूरक पद्धतीने होळी साजरी करताना परिसर स्वच्छ करून ओला कचर वेगळा करून उर्वरित कच-याची होळी किंवा घरातील टाकाऊ वस्तू जमा करून त्याची होळी करावी अथवा व्यसनांची होळी करून नवीन पर्याय समाजाला द्यावा तसेच होळीत पुजेच्या नावाखाली टाकली जाणारी पुरण पोळी,गाठी व ईतर खाद्य पदार्थ जळत्या होळीत न टाकता पुजा, नैवद्य दाखवून ते सर्व गरीबांना द्यावे किंवा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या केन्द्रावर जमा करावे
रंगपंचमीच्या दिवशी झाडांची फुले,पाने यांच्या पासून तयार होणारे नैसर्गिक रंग वा नैसर्गिक गुलालाचा वापर करून पाण्याचा होणारा अपव्यय थांबवावा असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा व शहर शाखा वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने वर्धेतील नागरिकांना करण्यात आले आहे होळीचा सण भारतभर वेगवेगळ्या नावाने भारतभर साजरा केला जातो आनंद मिळेल सर्व जण एकत्र येईल, वैरभाव नाहिसा होऊन मित्रत्व वाढेल अशा आशयाचा सण म्हणून साजरा केला जातो तर महाराष्ट्रातही जळावू लाकडे जाळून झाडे तोडून त्यात मोठ्या प्रमाणात पुरणपोळी व ईतर वस्तूसह गाठी पुजेच्या नावाखाली जळत्या होळीत टाकून जाळल्या जाते ज्याचा काहीही उपयोग होत नाही उलट विषारी वायू निर्माण होतो हे आज विज्ञानाने प्रयोगाअंती सिद्ध केले आहे तर जाळण्यासाठी जळावू लाकडे, अनेकदा जवळपासची झाडे तोडून तर विध्वंसक वृत्तीचे तरूण अनेकांची दारे खिडक्या खाट व ईतर लाकडी सामान चोरून होळीत टाकतात
त्यामुळे पर्यावरणाचा नाश होतो हे लक्षात घेतल्या जात नाही होळीचा सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे रंगाने ओलचिंब भिजून व मनसोक्त दारू,गांजा,भांग इत्यादी नशा देणारे अंगाला झिणझिण्या देणारे व्यसनाचे पदार्थ शरीरात रिचवून आनंदविभोर होवून आनंद साजरा करण्याचा भारतियांचा हा महत्वाचा सण मात्र रासायनिक रंग वापरल्यामुळे डोळे,त्वचा यांना हानी पोहोचते तर वरील नशा येणा-या पदार्थांचे सेवन केल्यास संपूर्ण शरीराला हानी पोहचण्यास मदत होते अपघात,हत्या, गंभीर मारामारी घडते त्यामुळे सण उत्सव साजरा करतांना विवेकाचे भान ठेवून रासायनिक रंग न वापरून व दारू गांजा भांग इत्यादी पदार्थांचे सेवन न करता होळी साजरी करावी
माणूस टोळ्या करून राहत असताना हिंसक प्राण्यांपासून सुरक्षित राहता यावे म्हणून सुरक्षेसाठी जंगल तोडून राहण्याच्या जागे भवती सभोवताल लाकडे जाळण्याची पणप्रथा सुरू झाली तर आनंद व्यक्त करण्यासाठी याच काळात अनेक रंगबिरंगी पळस वृक्षाला लक्ष वेधणारा फुलांचा बहार आलेला असतो माणूस याच फुलांचा उपयोग रंग म्हणुन करायचा मात्र माणसालाआज विज्ञान अवगत झाले तंत्रज्ञान माहित झाले अशातच औद्योगिक वापरात येत असलेल्या रंगाचा वापर तो आनंदाच्या क्षणी करायला लागला या रंगात रासायनिक पदार्थ असलेले पारा,शिसा,वेब,कॅनेनियम यासारखे विषारी वापरण्यात येते हे रंग चेह-याला,हाता पायाला चोळल्यास आपल्या डोळ्याला ,त्वचेला ईजा पोहचवतात हे रंग सहजा सहजी निघत नसल्यामुळे हजारो लिटर पाच वाया घालवल्या जाते त्यामुळे ते रंग वापरू नये.तर या आनंदाच्या क्षणी दारु, भांग,गांजा यांचा मोठ्या प्रमाणात शरीरात ग्रहण केल्या जाते ज्यामुळे पुढे व्यसन करण्याची म्हणजेच हे पदार्थ ग्रहण करण्याची सवय शरीराला लागून तो व्यसनाधीन होतो
यामुळे शरीरावर व शरीरातील लिव्हर,आतडे,हार्ट आदी अवयावर गंभीर परिणाम होवून ते निकामी होतात यामुळे गंभीर व्याधी निर्माण होतात तर अनेकदा मृत्यु ओढवतो या दिवशी नशेत झिंगून अपघात होतात, गंभीर प्रकारच्या जिवघेण्या मारहाणी होतात,महिलांवर अत्याचार व हिंसा होतेत्यामुळे रंगाची उधळण करतांना रासायनिक रंगा ऐवजी नैसर्गिक रंग, गुलाल वापरा दारू, गांजा ,भांग ,असे व्यसनी पदार्थ न वापरता अनेक नैसर्गिक पेय बाजारात उपलब्ध आहेत त्याचे सेवन करा एकमेकांना शुभेच्छा द्या गरीब कुटुंबातील लोकांना शक्य ती आंनंद देणारी मदत करा आणि हि होळी आनंदाने साजरी करा असे
आवाहन गजेंद्र सुरकार, बाबाराव किटे डॉ माधुरी झाडे, प्रकाश कांबळे,सारिका डेहनकर, अनिल मुरडिव ,अरुण चवडे, डॉ मंजूषा देशमुख,सूधाकर मिसाळ,भरत कोकावार, अरूण भोसले,सुनिल ढाले, डॉ सिध्दार्थ बुटले ,व्दारकाताई ईमडवार,ममता भगत,प्रा विलास भगत कविता राठोड, कविता लोहट, निखिल जवादे, कविता लोहट,प्रतीभा ठाकूर,पंकजा गादेवार ,नलिनीताई धावंजेवार, मैथिली मुळे,चारूशिला ठाकरे,विजय कडू, प्राचार्य राकेश कोडापे, अड.अरूण येवले,दिपक कदम,वनिता येवले,आदींनी केले आहे .

