अकोला विभाग प्रतिनीधी: – गणेश वाडेकर
मूर्तिजापूर शहरातील एका महाविद्यालयीन तरुणीला मोबाईलवर वारंवार त्रास देणाऱ्या इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेला मागील वर्षभरापासून अज्ञात इसम फोन करून त्रास देत होता. समजावूनही त्रास न थांबल्याने तिने मोबाईल क्रमांक बदलला, मात्र आरोपीने नवीन नंबर मिळवून पुन्हा कॉल केला. १० मार्च रोजी कारंजा टी पॉईंट येथे असताना आरोपीने पुन्हा फोन करून जबरदस्तीने बोलण्याचा प्रयत्न केला. मूर्तिजापूर शहर पोलीसांनी कलम १५३/२०२५ व भारतीय न्याय संहिता कलम ७८ नुसार गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे.

