वर्धा विभाग प्रतिनीधी: – युसूफ पठाण
- सापळा रचून केली कारवाई सिद्धार्थनगर परिसरात बेटिंग सुरू असल्याची माहिती होती.
- त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड, गजानन लामसे, चंद्रकांत बुरंगे, भूषण निघोट, मनीष कांबळे, अमोल नगराळे, मंगेश आदे, दीपक साठे, प्रफुल्ल पुनवटकर, अक्षय राऊत, अनुप कावळे यांनी सापळा रचला.
- शिताफीने आरोपीच्या घराजवळ जात छापा मारून त्यास अटक केली.
- आयडीच्या बदल्यात मिळत होती तीन टक्के रक्कम डॉक्टर ऊर्फ विशाल मून हा क्रिकेट बेटिंगसाठी साथीदार अक्षय मेंढे, रा. समतानगर याच्याशी कनेक्ट होता.
तो ग्राहकांना लागणारी आयडी ऑनलाइन तयार करून देत होता. बदल्यात त्याला जुगारातील तीन टक्के रक्कम विशाल देत होता. मोठ्या रकमेची खायवाडी व लागवडी आली असता नेहमीप्रमाणे तो त्याचा साथीदार योगेश पंजवाणी, रा. दयालनगर याच्याकडे व्यवहार करत असल्याची माहिती दिली. याप्राकरणी विशाल मून याला अटक करून इतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
वर्धा:- दुबई येथे सुरू असलेल्या आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीच्या भारत विरुद्ध न्यूझीलंड या अंतिम सामन्यांवर बेटिंग लावून जुगार भरविणाऱ्या बुकीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली.
पोलिसांनी आरोपी बुकीकडून कार, रोख रक्कम, तीन मोबाइल असा एकूण ५ लाख ६१ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त आरोपीस करून एका बेड्या ठोकल्या, तर दोघे जण फारार आहेत.५लाख ६१ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल केला जप्तपोलिस पथक गस्तीवर असताना सिद्धार्थनगर येथील रहिवासी विशाल ऊर्फ डॉक्टर प्रमोद मून (३२) हा राहत्या घरातून क्रिकेट सामन्यावर जुगार लावत असल्याची माहिती मिळाली होती. दरम्यानछापा मारून आरोपी विशाल ऊर्फ डॉक्टर प्रमोद मून यास बेड्याठोकल्या.आयडीवरून सुरू होता क्रीकेटवरील जुगारआरोपी डॉक्टर हा समोरील खोलीत बसून आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी २०२५ या क्रिकेटच्या सामन्यावरमोबाइलद्वारे ऑनलाइन हार-जितीचा जुगार खेळताना मिळाला.
त्याच्याकडून मोबाइल जप्त केला. तो मोबाइलमध्ये अॅप डाऊनलोड करून विविध आयडीवर त्याने स्वतःचे युजर नेम व पासवर्ड तयार करून त्याद्वारे भारत विरुद्ध न्यूझीलंड मॅचवर जुगार खेळण्यासाठी स्वतःची आयडी बनवून जुगारातील ग्राहकांना दिल्याचे दिसून आले.


