वर्धा विभाग प्रतिनीधी: – युसूफ पठाण
- शहरात असुरक्षितता वाढली, चोरट्यांचा झाला सुळसुळाट
- सरासरी ९,००० रुपये रोख होते पाकिटात
- न्यायाधीशांच्या चोरीला गेलेल्या पॉकिटात महत्त्वाची कागदपत्रे आणि रोख नऊ हजार रुपये होते.
- त्यांचे ओळखपत्र, चालक परवाना, आधारकार्ड, दोन एटीएम कार्ड, दोन क्रेडिट कार्ड, पासपोर्ट फोटो आदी कागदपत्रे त्यात होती.
- भाजीपाला दुकानावरील गर्दीचा फायदा घेऊन त्यांचे पाकीट चोरी करण्यात आले. त्यांनी रविवारी शहर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
वर्धा : भाजीपाला घेण्यासाठी गेलेल्या न्यायाधीशांचेच पॉकीट चोरट्याने लंपास केले. ही घटना येथील आरती चौकातील एका शाळेजवळील भाजीबाजारात घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तक्रारकर्ते न्यायाधीश तिवसा न्यायालयात न्यायाधीश पदावर कार्यरत आहेत. शनिवारी दुपारी ३:०० वाजताच्या सुमारास ते तिवसा येथून वर्धा येथे आले. नंतर सायंकाळी ७:०० वाजताच्या सुमारास ते आरती चौकातील एका शाळेसमोरील भाजीबाजारात भाजीपाला घेण्यास गेले.
तेथे थोडी फार गर्दी होती. भाजीपाला विकत घेतल्यानंतर पैसे देण्यासाठी त्यांनी पॅन्टच्या खिशातील पाकीट काढण्यास गेले असताना पाकीट आढळले नाही. त्यांनी आजूबाजूला बघितले. नंतर पाकीट कोणी तरी अज्ञात चोरट्याने काढल्याची त्यांची खात्री झाली. त्यामुळे त्यांनी शर्टातील खिशातील पैसे काढून भाजीपाला विक्रेत्याला दिले. तेथे गर्दी असल्याने त्यांना कोणावर संशयही घेता आला नाही.


