दि. 06/03/25दीड वर्ष उलटूनही न्याय व मदतीपासून वंचित, समृद्धी महामार्गावर स्वजणांना वाहिली पुष्पाजंली
१ जुलै २०२३ रोजी समृद्धी महामार्गावर अतिशय भीषण असा अपघात पडला होता, नागपूरहून पुण्याच्या दिशेने जाणारी खाजगी प्रवासी बस एका छोट्या पुलाला धडकून वा बसला आग लागली होती व या आगीत झोपेत असलेल्या २५ प्रवाशांचा होरपळून जागीच मृत्यू झाला होता. त्यावेळेस घटनेने संपूर्ण देश हळहळला होता. घटनेचं गांभीर्य बघता तात्काळ तात्कालीन मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतांच्या नातेवाईकांना तात्काळ मदतही जाहीर केली होती. मात्र दीड वर्ष होऊनही मृतकांच्या नातेवाईकांना मदत मिळाली नसल्याचा आरोप करत, या वर्धा, नागपूर व यवतमाळ जिल्ह्यातील मृत प्रवाशांच्या नातेवाईकांनी काल सायंकाळी थेट धडक दिली. ती सिंदखेड राजा पोलीस स्थानकात व पोलीस स्थानकाच्या आवारात अपघात ग्रस्त बस अद्यापही उभी असल्याने या बस कडे बघून अक्षरशः हे नातेवाईक पायमोकलून रडले या प्रवासी बसच्या मालकावर किंवा चालकावर कुठली कारवाई झाली नसल्याने व सरकारने जाहीर केलेली मदतही मिळाली नसल्याने या घटनेतील मृत प्रवाशांचे नातेवाईक वर्धा आणि यवतमाळ येथून बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील समृद्धी महामार्गावर असलेल्या घटनास्थळी मुक आंदोलन सुरू केले. जोपर्यंत सरकार या बस चालकावर व मालकावर ठोस कारवाई करत नाही व जाहीर केलेली मदत देत नाही तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही अशी भूमिका या नातेवाईकांनी घेतली होती.
(पुष्प वाहून झाले नतमस्तक) या घटनेत कुणाची आई तर कुणाचे वडील नव्हे तर कुणाचे संपूर्ण कुटूंबाधा आगीत होरपळून मृत्यू झाला होता. दीड वर्षानंतर आलेल्या कुटुंबातील मरण पावलेल्या सदस्यांना पुष्प वाहून रस्त्यावर घटनास्थळी सर्वजण नतमस्तक झाले व स्वजणांना श्रद्धांजली वाहिली.