वर्धा विभाग प्रतिनीधी: – युसूफ पठाण
वर्धा:-रूग्णांची वाढती संख्या, महामार्गावर सतत होणारे अपघात व वेळीच आरोग्य सुविधा मिळत नसल्याने होणा-या मृत्यूंची संख्या लक्षात घेता भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुनिल गफाट यांनी शासनाकडे सातत्यपुर्ण प्रयत्न केल्याने आंजी मोठी येथे 30 खाटांचे ग्रामीण रूग्णालय अखेर मंजूर करण्यात आले आहे. ग्रामीण रूग्णालयामुळे वर्धा, आर्वी, देवळी व कारंजा तालुक्यातील जवळपास 80 गावांना याचा लाभ होणार आहे.
वर्धा तालुक्यातील आंजी मोठी गांव वर्धा- आर्वी- कारंजा राष्ट्रीय महामार्गावर वसलेले असून एक मोठे गाव आहे. आंती गावाशी अनेक गावे जोडली आहे. मात्र गावात आरोग्य सुविधा नसल्याने परिसरातील गावाना आरोग्याच्या सुविधेसाठी वर्धा अथवा आर्वी येथे जावे लागते होते. वेळीच वाहन न मिळाल्याने व दोन्ही ठिकाणे दुर असल्याने अनेकदा रूग्णाचा वाटेतच मृत्यू होत होता. मागील काही वर्षात महामार्गावर अपघाताचे देखील प्रमाण वाढले आहे. या गंभीर बाबींची दखल घेत भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुनिल गफाट यांनी आंजी येथे ग्रामीण रूग्णालयाच्या निर्मितीसाठी प्रयत्न सुरू केले.
- आठ वर्षांच्या लढयाला आले यश
सुनिल गफाट यांनी सन 2016 मध्ये आंजी येथे ग्रामीण रूग्णालयाची सर्व प्रथम मागणी केली. तत्कालीन विधान परिषद सदस्य अनिल सोले यांच्या माध्यमातून त्यांनी शासन स्तरावर प्रयत्न सुरू केले. 2017 मध्ये जिल्हा आरोग्य विभागाने प्रस्ताव सादर करून उपसंचालक व नंतर संचालक आरोग्य विभागाकडे पाठविण्यात आला. मात्र प्रस्तावात त्रुटी असल्याने यावर अंतिम निर्णय होऊ शकला नाही. दरमियान तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिप निवडणुकीच्या प्रचार निमित्ताने आंजी येथे आले होते. यावेळी गफाट यांनी ग्रामीण रूग्णालयाची मागणी लाऊन धरली होती. फडणवीस यांनी एक वर्षात रूग्णालयाची निर्मिती करण्याचे आश्वासन दिले.या आश्वासनाची पूर्तता करीत फडणवीस यांनी 2019 मध्ये रूग्णालयाला मान्याता दिली. मात्र राज्यात सत्तापरिर्वतन झाल्याने पुन्हा एकदा ग्रामीण रूग्णालयाच्या निर्मितीला ग्रहण लागले. जागेचा प्रश्न व अंदाजपत्रकात समावेश नसल्याने रूग्णालयाचे काम पुढे सरकू शकले नाही. राज्यात पुन्हा भाजपाचे सरकार आल्याने भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुनिल गफाट यांनी रूग्णलयाच्या निर्मितीसाठी प्रयत्न सुरू केले. आ. राजेश बकाणे व पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या सहकार्यामुळे अखेर आठ वर्षानंतर आंजी येथे 30 खाटांचे रूग्णालय मंजूर करण्यात आले.
- 26 कोटी रूपयांचा निधी मंजूर
आंजी येथील ग्रामीण रूग्णालयाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. रूग्णालयासाठी 26 कोटी 1 लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तळमजला व पहिला मजला असे रूग्णालयाचे स्वरूप राहणार आहे. तळमजला 2628.75 चौमी व पहिला मजला 2218.21 चौ.मी.चा असा एकूण 4846.96 चौमीचा असणार आहे. अंतर्गत रस्ते, मलनिस्सारण, पाणीपुरवठा, सीसीटिवी, आग प्रतिबंधक, लिफ्ट, संरक्षण भिंत, वातानुकुलीत यंत्रणा व अन्य सुविधा राहणार आहे.
- गफाट यांनी मानले फडणवीस व भाजपाच्या नेत्यांचे आभार
आंजी येथे ग्रामीण रूग्णालय मंजूर केल्याबद्दल सुनिल गफाट यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार, विद्यमान पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, माजी खासदार रामदासजी तड़स,माजी आमदार आनील सोले,आ. राजेश बकाणे यांचे आभार मानले.

