अकोला प्रतिनिधि गणेश वाडेकर
अकोला:- माजी मंत्री बाबा सिद्दीकी याची मुबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्या हत्येतील पचविसावा आरोपी सलमानभाई इकबालभाई वोहरा याला शनिवारी मध्यरात्री नंतर म्हणजे रविवार दि. १७ नोव्हेंबर रोजी २ वाजता बाळापूर तालुक्यातील उरळ पोलीस स्टेशन हद्दीतील लोहारा गावातून मुंबई गुन्हे शाखा, स्थानिक गुन्हे शाखा व उरळ पोलीसांच्या मदतीने अटक करण्यात आली असून तो गुजरातमधील रहिवासी आहे. वोहरावर खुन प्रकरणातील आरोपींना आर्थिक मदत केल्याचा आरोप असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.


