परभणी जिल्हा विभाग प्रमुख:-प्रल्हाद निर्मळ
परभणी:- परभणी जिल्ह्यामध्ये निवडणूक प्रचाराला वेग गंगाखेड मतदार संघात खऱ्या अर्थाने तिरंगी लढतयावेळी परभणी जिल्ह्यातील गंगाखेड मतदार संघाकडे सर्वांचे लक्ष आकर्षित करणारा मतदारसंघ दिसून येत आहे. प्रचाराला आता वेग आलेला आहे. स्वतः उमेदवार ग्रामीण भागामध्ये मतदारांची हितगुज करताना दिसत आहेत. गंगाखेड मतदार संघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार पुरनेचेभूमिपुत्र विशाल कदम तर महायुतीचे उमेदवार डॉ, रत्नाकर गुट्टे तसेच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सिताराम घनदाट या तिन्ही उमेदवाराची खऱ्या अर्थाने तीरगी लडत पाहायला मिळणार आहे.

प्रचार आता अंतिम टप्प्यात असून वेग वाढलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तरुण तडफदार उमेदवार तथा पुरनेचे भूमिपुत्र विशाल कदम यांनी पूर्णातालुका गंगाखेड तालुका ग्रामीण भागात सभेला जास्त भर दिलेला आहे. तिने उमेदवारांनी मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न जोरामध्ये चालू आहे. मतदार राजा गंगाखेड मतदार संघामध्ये कोणत्या उमेदवाराला कौल देईल याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. तर यामध्ये अपक्ष उमेदवार सुद्धा जोराची लढत देणार असे पण दिसत आहे.

