गणेश राठोड
उमरखेड तालुका प्रतिनिधी
उमरखेड-महागाव विधानसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार साहेबराव कांबळे यांच्या विजयासाठी ग्रामीण भागातील कार्यकर्ते एकजुटीने मेहनत घेत आहेत. गावागावांत प्रचाराचे वातावरण तापले असून, कार्यकर्ते साहेबराव कांबळे यांच्या नेतृत्वाखालील विकासकामे व जनतेच्या प्रश्नांवरील ठोस भूमिकांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवत आहेत.
गावपातळीवर बैठकांद्वारे कार्यकर्त्यांना प्रचारासाठी दिशा दिली जात असून, घराघरात जाऊन प्रचार करण्यावर भर देण्यात आला आहे. साहेबराव कांबळे यांनी नेहमीच ग्रामीण भागातील गरजूंसाठी लढा दिला आहे, याची जाणीव मतदारांना करून दिली जात आहे.

महाविकास आघाडीच्या एकजुटीचा आधार घेत साहेबराव कांबळे यांना विधानसभेत विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रचंड उत्साहाने कंबर कसली आहे. त्यांच्या नेतृत्त्वाखाली महागाव-उमरखेड भागाला प्रगतीच्या मार्गावर नेण्याचा दृढ विश्वास मतदारांमध्ये निर्माण केला जात आहे.
साहेबराव कांबळे यांचा विजय म्हणजे ग्रामीण भागाच्या आशा-आकांक्षांचा विजय हा संदेश देत कार्यकर्ते प्रचाराला उर्जा देत आहेत.

