वर्धा प्रतिनिधी :- इम्रान पठाण. वर्धा:- कारवाईचा प्रस्ताव सावंगी ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप कापडे यांनी पाठविला होता. त्या प्रस्तावावर पोलिस अधीक्षकांमार्फत विशेष पोलिस महानिरीक्षकांकडून आदेश पारीत करण्यात आला आहे.

आदिल शेख इसराईल शेख, अक्षय दिगांबर पटेल, अजय वासुदेव राठोड, सौरभ अंकुश बोरकर, रोशन सुनील लिडबे, रंजीतसिंग उपेंद्रसिंग धुरवाल यांनी धारदार शस्त्र घेऊन शीख बेडा परिसरातील रणविरसिंग भादा याच्यावर वार करून जखमी केले होते. या सर्वांना सावंगी पोलिसांनी अटक केली होती. हे आरोपी गुंडा प्रवृत्तीच्या लोकांची टोळीनिर्माण करून स्वतःच्या व इतरांच्या फायद्यासाठी जबरी चोरी करणे, शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान
करणे, अवैध दारुविक्री करणे, जुगार आदींसारखे गंभीर गुन्हे करणारे आहेत. आदिल शेख हा टोळी प्रमुख असून, त्याच्यासह इतरांवर गुन्हे अभिलेखावर १० वर्षांत तब्बल ६७ गुन्हे विविध पोलिस ठाण्यात दाखल आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक संदीप कापडे यांच्या निर्देशात पोलिस उपनिरीक्षक कैलास खोब्रागडे, नबी शेख, संजय खल्लारकर, जावेद धामिया, सतीश दरवरे आदींनी केली…..

