सातारा विभाग:- निलेश कोकणे प्रतिनिधी

माण तालुका प्रतिनीधी: – निलेश कोकणे. माण खटाव चे लोकप्रिय युवा नेते श्री शेखरभाऊ गोरे यांनी नुकताच भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला आहे. या पक्ष प्रवेशाचे सर्व स्तरातून खूपच स्वागत केले जात आहेत. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार ) गट पक्षाने संधी न दिल्यामुळे पक्षावर नाराज होत पक्ष सोडण्याचा हा निर्णय घेण्यात आला.
जयकुमार गोरे बंधूना प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी शेखरभाऊ गोरे स्वतः पायाला भिंगरी बांधून माण खटाव मतदार संघात फिरताना दिसत आहेत.
जनतेतून खूप मोठा उदंड प्रतिसाद मिळत आहे. कोपरा सभा. घर भेटी. असे उपक्रम चालू आहेत. अनेक जण भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश सुद्धा शेखरभाऊ गटामध्ये होताना दिसत आहेत. स्वखर्चाने विकास करणारा नेता म्हणून शेखरभाऊ गोरे यांची संपूर्ण महाराष्ट्रभर ओळख आहे. मोफत रुग्णवाहिका. पिण्याच्या पाण्याचे टँकर.हा त्यांचा समाजसेवेचा ठेवा आहे.आम्ही दोघे भाऊ मिळून माण खटाव चा सर्वांगीण विकास करू. माण खटाव सुजलाम सुफलाम करू. जलक्रांती. शैक्षणिक क्रांती. औधोगिक क्रांती घडवून आणू असा शब्द जनतेला दिला आहे.


