सातारा विभाग माण तालुका प्रतिनिधी:- निलेश कोकणे महाविकास आघाडी च्या वतीने माण खटाव मतदार संघांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री प्रभाकरजी घार्गे साहेब यांच्या प्रचारार्थ माजी केंद्रीय कृषी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आदरणीय श्री शरदचंद्र पवार साहेब यांची येत्या 16 तारखेला महाविराट सभेचे नियोजन करण्यात आले आहे.माण खटाव मतदार संघ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूपच महत्वपूर्ण समझला जातो. कारण की सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस (श.प ) गट पक्षाचा बालेकिल्ला समझला जातो.माढा मतदार संघातून पवार साहेब खासदार म्हूणन प्रचंड बहुमतांनी निवडून आले होते. त्या विजयात माण खटाव तालुक्याचा खूप मोठा वाटा होता. यावेळी खटाव तालुक्याला मान देऊन माजी विधानपरिषद सदस्य श्री प्रभाकर घार्गे यांना उमेदवारी देण्यात आली.

सहकारी संस्था. सोसायट्या.साखर कारखाना. ग्रामपंचायत. नगरपंचायत. जिल्हा बँक. यामध्ये प्रभाकर घार्गे साहेबांचा काम करण्याचा अनुभव आहे. मोठा जनसंपर्क. अतुलनीय सामाजिक कार्य. सतत जनतेच्या सहवासात राहणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. म्हणून पवार साहेबांनी योग्य उमेदवाराची निवड केली.बोला राम कृष्ण हरी. वाजवा तुतारी. हे ब्रीद वाक्य खूप काही सांगुन जाते.पवार साहेबांचा आदर्श हा खूपच घेण्यासारखा आहे.संपूर्ण महाराष्ट्रभर सभा घेऊन जनतेला एक नवीन प्रेरणा. नवी दिशा. चांगली उमेद. विकासासाठी साथ द्या. हा शुभ संदेश जनतेला देत आहेत. तरी माण खटाव तालुक्यातील सर्व जनतेने लाखोंच्या संख्येने येत्या 16 तारखेला बाजार पटांगण दहिवडी उपस्थित राहावे असे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.

