अकोला विभाग प्रतिनिधी इम्रान खान सरफराज खान
अकोला: आलेगाव येथे वनविभागाच्या धडक कारवाईत एका फर्निचर दुकानावर छापा टाकून लाखो रुपयांचे अवैध सागवान जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.गुप्त माहितीच्या आधारे दिनांक २२ फेब्रुवारी रोजी आलेगाव परिसरातील जांब फाटा नजीक असलेल्या न्यू वूड फर्निचर दुकान आणि समोरील बंद गोदामावर वनविभागाने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई केली.

या छाप्यात मोठ्या प्रमाणावर अवैध सागवान लाकडाची साठवणूक केल्याचे आढळून आले. दुकान मालक अजहर खान तय्युब खान आणि त्याचा साथीदार शेख वाजीद शेख सलीम यांना घटनास्थळीच अटक करण्यात आली.लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आले या कारवाईत वनविभागाने २६० घन मीटर (१.४१८ घ. मी.) चौरस सागवान जप्त केला, ज्याची किंमत रुपये १,३३,४२३/- आहे. तसेच, ५१ नग (३.११८ घ. मी.) सागवान गोल लाकूडही जप्त करण्यात आले, ज्याची किंमत रुपये २,२०,०३४/- इतकी आहे. एकूण रुपये ३,५३,४५७/- किमतीचा मुद्देमाल वनविभागाने ताब्यात घेतला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सदर कारवाई उपवनसंरक्षक कुमारस्वामी एस.आर., सहायक वनसंरक्षक एस.के. खुणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी एस.डी. गव्हाणे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या मोहिमेत वनपाल एम.एस. सय्यद, एन.बी. अंभोरे, आर.एस. काकडे, एन.ए. सावळे, डी.ए. सुरजुसे, पी.एस. राठोड, जी.एस. गायगोळ, व्ही. एस. पराते, व्ही.जी. बावस्कर, जे.ए. गाडे आणि एस.डी. जामकर यांच्या पथकाने सहभाग घेतला.नागरिकांना आवाहन वनविभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्या परिसरात कोणत्याही प्रकारचा अवैध सागवान तस्करी किंवा वनगुन्हा आढळल्यास त्वरित वनपरिक्षेत्र कार्यालय, आलेगाव अथवा वन विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1926 वर माहिती द्यावी. त्यामुळे अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांना आळा घालता येईल.

