अकोला विभाग प्रतिनिधी गणेश वाडेकर
*स्व. कांतादेवी गोयनका यांच्या भाडेकरूची तक्रार स्थानिक रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या रतनलाल चौक येथील गोयनका कॉम्प्लेक्स मधील एका दुकान भाडेकरू यांना दुकान उघडू न देता खाली करण्यासाठी दबावतंत्राचा वापर करण्यात येत असल्याची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांना शुक्रवारी करण्यात आली. पवन कनोजिया असे तक्रारदाराचे नावत्या प्रतिष्ठित महिला आणि गुंडांपासून आता नव्यानेच उघडकीस आला असून स्थानिक रामदास पेठपोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या रतनलाल चौक येथील गोयनका कॉम्प्लेक्स मधील दुकान भाडेकरूने या दबावतंत्राला अनुसरून आधी जिल्हाधिकारी तर आता जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांना संपूर्ण प्रकाराबाबत थेट तक्रार दिली आहे. तक्रार पवन कनोजिया याचे स्व. कांतादेवी गोयनका यांच्या मालकीच्या गोयनका कॉम्प्लेक्स मध्ये’ पवन पान अँड कोल्ड्रिंक’ या नावाने अनेक वर्षांपासून दुकान होते. त्याचा मनपा कराचा भरणा सुद्धा आपण केला असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. सद्यस्थितीत कांतादेवी गोयनका या हयात नाही.

