अकोला विभाग प्रतिनिधी इम्रान खान सरफराज खान
अकोला, दि. २२ : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत पाणलोट विकास यात्रेला जिल्ह्यात उद्यापासून (23 फेब्रुवारी) प्रारंभ होत आहे.
उद्यापासून 28 फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील बारा गावांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येईल. दि. २३ रोजी बाळापुर तालुक्यातील बटवाडी बु. आणि बटवाडी खुर्द येथे अनुक्रमे सकाळी ९ व दुपारी २ वाजता, दि. 24 रोजी पातूर तालुक्यातील जांब व पिंपळडोळी, 25 रोजी अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू व सोनाळा, 26 रोजी बार्शीटाकळी तालुक्यातील घोटा व पाराभवानी, 27 रोजी मुर्तीजापुर तालुक्यातील चिखली व कादवी, 28 रोजी तेल्हारा तालुक्यातील चितळवाडी व खंडाळा येथे पाणलोट यात्रा आयोजित करण्यात आली आहे.पाणलोट यात्रेद्वारे पाणलोट व्यवस्थापनाबाबत जनजागृती केली जाणार आहे.पुढील आठवडाभरात पाणलोट रथाचे स्वागत करणे, नवीन कामांचे भूमिपूजन करणे वृक्ष लागवड करणे, पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण करणे, पाणलोट योद्धांना बक्षीस देणे पथनाट्याद्वारे पाणलोट व्यवस्थापनाचे महत्त्व सांगणे, मृद व जलसंधारणाची शपथ आदी कार्यक्रम घेण्यात येतील अशी माहिती जिल्हा जलसंधारण अधिकारी अमोल मस्कर यांनी दिली.

