बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सुनील वर्मा
आज सकाळी ९ वा दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीड जवळील टोलनाक्यापासून ५०० मीटर अंतरावर हुंडाई आय टेन कार क्रमांक एम एच ०४ एल बी ३१०९ च्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. समृद्धी महा मार्गाने सदर कार मुंबईतहुन अकोल्याच्या दिशेने जात असताना चॅनेज क्रमांक ३१८.८ जवळ नागपूर कॅरिडोरवर चालक नामे अभिजीत अर्जुन चव्हाण वय ३५ वर्ष मुंबई यांचे कार वरील नियंत्रण सुटल्याने कार मिडीयम मधील क्रैश बरिअरला धडकून सदर बॅरियरची पट्टी कार च्या समोरील भागातून घुसून आरपार पाठीमागून निघाली. व कार ने तात्काळ पेठ घेतला. यामध्ये अकोला येथे बहिणीच्या घरी जात असलेले गणेश सुभाष टेकाळे वय ४० वर्ष व राजू महंतलाल जयस्वाल वय ३२ वर्ष दोन्ही रा. मुंबई यांचा जागेवरच होरपळून मृत्यू झाला. चालक अभिजीत अर्जुन चव्हाण वय ३५ वर्ष हा गंभीर जखमी झाल्याने तात्काळ बीबी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतकाचे शव सिंदखेड राजा येथील ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले. अपघात घडला त्यावेळी तात्काळ समृद्धी महामार्ग टीम व महामार्ग पोलीस चे पीएसआय गजानन उज्जैनकर, शैलेश पवार, पोहेकों विठ्ठल काळुसे, मुकेश जाधव, संतोष वनवे, संदीप किरके, अरुण भुतेकर व एम एस एफ स्टॉप यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून सदर मृतदेह जळालेल्या कारमधून बाहेर काढले. व सदर ठिकाणी तात्काळ किनगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरवाडे व देऊळगाव राजा उपविभागाचे मनीषा कदम मॅडम यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पुढील कारवाई केली.

