बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सुनील वर्मा
सिंदखेड राजा तालुक्यातील एकनाथ पवार यांची संघर्षमय कहाणीबुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील जनुना गावचे रहिवासी एकनाथ तुकाराम पवार आणि त्यांची पत्नी ललिता पवार यांची जीवनकथा ही एका अनोख्या संघर्षाची आहे. गेल्या दहा वर्षांपासून हे दाम्पत्य आपल्या कुटुंबासह ट्रकमधून प्रवास करीत आहे,
ज्यामध्ये त्यांच्या तीन मुली देखील सोबत असतात. या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती इतकी बेताची आहे की दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी ललिता पवार देखील ट्रक चालविण्यात मदत करते.एकनाथ पवार यांनी सांगितले की, आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना पत्नीचा हातभार लागावा लागतो. त्यांच्या तीन मुलींपैकी दोन, ७ वर्षाची आणि ५ वर्षाची मुलगी, ट्रकमध्ये राहतात, तर ९ वर्षाची मोठी मुलगी गावात राहते. वडधामना येथे पवार कुटुंब आपल्या मुलींना घेऊन ट्रक भरण्यासाठी आले असताना ही संघर्षमय कहाणी समोर आली.

