माहिती संकलन विभाग प्रमुख पियुष गोंगले
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय एटापल्ली जिल्हा .गडचिरोली येथे भारतीय राज्यघटनेच्या ७५ वर्ष पूर्ती निमित्त *संविधान गौरव महोत्सव* अंतर्गत महाविद्यालयात दि.२०/०२/२०२५ ला भारतीय राज्यघटने संदर्भात पोस्टर स्पर्धा चे आयोजन करण्यात आले.यामध्ये महाविद्यालयातील १५ विद्यार्थी विद्यार्थिनीं सहभागी झाले यावेळी प्रमुख पाहुणे श्री.जनार्धन नलावार , प्रा डॉ.सुधीर भगत, प्रा. डॉ.विनोद पतिवार, राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ विश्वनाथ दरेकार, प्रा.निलेश दुर्गे , प्रा डॉ शरद कुमार पाटील,प्रा. भारत सोनकांबळे उपस्थित होते. परीक्षक म्हणून प्रा . राहुल ढबाले, श्री.राजुरकर होते. यावेळी कार्यक्रमात महाविद्यालयाचे शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.

