अकोला प्रतिनिधी:- गणेश वाडेकर

अकोला:- जुने शहर पोलिस स्टेशन हद्दीतील मोळकेवाडी परीसरातील शेख मोहसिन उर्फ गुड्डु शेख बशीर (२८) याच्या ताब्यातून २५ हजार ५०० रुपये किमतीची १ जिवंत काडतुस व गावठी बनावटीची पिस्टल जप्त करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. या प्रकरणी जुने शहर पोलिसात आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अकोला जिल्ह्यात अवैध रकमेची वाहतुक, अंमलीपदार्थ, अग्नीशस्त्र इत्यादी बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यासाठी पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी पथक नेमले आहे.


