वर्धा न्युज ब्युरो : – इम्रान खान
वर्धा:- विकासकामांच्या नावावर चाललेला भ्रष्टाचार, वाढलेली महागाई आणि बेरोजगारी, यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे वर्धा विधानसभेच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेत विधानसभेच्या रिंगणात उडी घेतली आहे. जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा उदंड प्रतिसाद मिळत असून हीच परिवर्तनाची नांदी ठरणार असल्याचे मत अपक्ष उमेदवार डॉ. सचिन पावडे यांनी व्यक्त केले.वर्धा विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार डॉ. सचिन पावडे यांनी सामाजिक कार्याच्या माध्यमातून आणि जनजागृतीतून जनसामान्यांच्या मनात एक जागा निर्माण केली आहे.

त्याचा अनुभव निवडणूक दरम्यानच्या जनसंवाद यात्रेतील प्रतिसादातून दिसून येत आहे. वर्धा शहरातील अनेकांच्या तोंडी ‘शिट्टी‘ वाजायला लागली आहे. नुकताच वर्ध्यातील प्रत्येक प्रभाग, मुख्य बाजारपेठेतून या जनसंवाद यात्रेने मार्गक्रमण करून लगतच्या ग्रामीण भागाकडे मोर्चा वळविला आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, युवक आणि सर्वसामान्यांच्या समस्या डॉ. सचिन पावडे जाणून घेत आहे.शेतमालाला भाव नाही, लागवड खर्चही भरून निघत नाही. उद्योग नसल्याने हाताला काम नाही. महागाईवाढल्याने समाधानाने जगता येत नाही. त्यामुळे परिवर्तनाशिवाय पर्याय नसल्याचे खुद्द मतदारच सांगत असून डॉ. पावडे यांच्या प्रचार रॅलीला मिळालेल्या प्रतिसादात दिवसेंदिवस भर पडत आहे.


