🔷 पियूष गोंगले माहिती विभाग प्रमुख 🔷
दिं. १३ फेब्रुवारी २०२५
चिमूर:- श्रीहरी बालाजी महाराज घोडारथ यात्रेनिमित्त भव्य घोडा यात्रा महोत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले. या भक्तिमय सोहळ्यात माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री श्री.अशोकजी नेते यांनी उपस्थित राहून श्रीहरी बालाजीचे दर्शन घेतले व आपली श्रद्धा व्यक्त केली.
याच महोत्सवानिमित्त आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या सुप्रसिद्ध गायिका गीताबेन रब्बारी यांच्या भक्तिगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपस्थित राहून मा.खा. अशोकजी नेते यांनी संगीताचा आस्वाद घेत भक्तिरसात न्हाल्याचा अनुभव व्यक्त केला.
हा भव्य आणि दिमाखदार कार्यक्रम चिमूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार बंटीभाऊ ऊर्फ कीर्तीकुमार भांगडिया यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामागे त्यांचे मोलाचे योगदान राहिले.
याप्रसंगी ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजुभाऊ देवतळे, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, भाजपा तालुकाध्यक्ष राजुभाऊ पा. झाडे, जेष्ठ नेते व प्रदेश कार्यकारिणी सदस्य वसंतराव वारजुरकर, जेष्ठ नेते तथा प्रदेश कार्य.सदस्य घनश्यामजी डुकरे, जेष्ठ नेते डॉ. दिलीपजी शिवरकर, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष आशिषभाऊ पिपरे, भाजयुमो प्रदेश सदस्य मनिषभाऊ तुंम्पलीवार यांच्यासह असंख्य नागरिक, कार्यकर्ते आणि भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या भव्य सोहळ्याने चिमूर नगरी भक्तिरसात न्हाली असून, संगीत आणि अध्यात्माच्या संगमाने उपस्थितांचे मनोभाव भरून आले.


