अकोला विभाग प्रतिनीधी: – गणेश वाडेकर
*अकोला: जिल्ह्यातील अकोट ग्रामीण*: पोलिसांनी दहीखेड शेत शिवारात भालेराव यांच्या शेतात ५२ पत्त्यावर पैशाची हारजित करणाऱ्या जुगाऱ्यांवर १२ फेब्रुवारीच्या रात्री ग्रामीण पोलिसांनी छापा मारून ४ जुगाऱ्यांना रंगेहाथ पकडून त्यांच्या जवळून ४ दुचाकी व नगदी ३२४० असा २, ०३, २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध कलम १२ महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलिसांनी केल्याची माहिती काल१३ फेब्रुवारीला दिली.


