जयकुमार गोरे:- ग्रामविकास पंचायत राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
सातारा विभाग:- निलेश कोकणे (माण खटाव)
- म्हसवड मध्ये साडेतिन हजार एकरवर एमआयडीसी उभी केली जाणार..
- माण खटाव तालुक्याच्या विकासात हा एक ऐतिहासिक प्रकल्प येणार असल्याचे नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
माणखटाव विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक तरुणाच्या हाताला काम मिळावे यासाठी मी नेहमीच कटिबद्ध भूमिका घेतली आहे. सततचा पाठपुरावा आणि प्रयत्नानंतर म्हसवड येथे एमआयडीसी मंजूर करण्यात आली आहे. हजारो कोटींचा हा प्रकल्प उभा राहत असून या माध्यमातून या भागातील लोकांना मोठा रोजगार प्राप्त होईल मतदारसंघातील हजारो तरुणांच्या हाताला काम मिळणार असून यापुढे देखील विविध प्रकल्प मंजूर करून रोजगाराची समस्या मार्गी लागेल.
मतदारसंघांमधून जाणारा पुणे बंगलोर महामार्ग आणि आता एमआयडीसी असे एका पाठोपाठ एक प्रोजेक्ट आणले जात आहेत. विविध विकासकामे आणि जलसिंचन योजनेचे काम जोरात सुरू आहे, म्हसवड येथे सुरू होणाऱ्या एमआयडीसी मुळे शेतकरी, भाविक भक्त , शेतमजूर कामगार उद्योजक नोकरदार वर्ग यांना खूप मोठा फायदा होणार आहे. एमआयडीसीचा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मतदारसंघ सुजलाम सुफलाम नक्कीच होईल यात तिळमात्र शंका नाही.त्यामुळे या भागातील जनतेचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल.

विकासाची दूरदृष्टी असलेले आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या मार्गदर्शनात महायुतीचे सरकार आणि आमचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे प्रतिनिधत्व करत आहेत. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्रासह माण खटावचे प्रतिनिधत्व करत आहे त्यामुळें माण खटाव मतदार संघाचा चौफेर विकास होत आहे , नक्कीच येत्या काळात या भागातील जनतेला सुगीचे दिवस येतील.
साडेतिन हजार एकर जागेवर उभ्या राहणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील सुसज्ज अशा एमआयडीसी मुळे माण खटाव विधानसभा मतदारसंघासह सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार असून माण _खटावसाठी हा निश्चितच गेमचेंजर ठरेल यात शंका नाही !

