अकोला जिल्हा प्रतिनीधी: – गणेश वाडेकर
पिंपळशेंडा शिवारातील गट नंबर ११३ मध्ये शासनाने लघु उद्योग क्षेत्रासाठी ९.४९ हेक्टर आर (रिझर्व) जमीन संपादित केली होती. या प्रकल्पामुळे तालुक्यातील हजारो बेरोजगारांसाठी रोजगार उपलब्ध होईल आणि राज्याच्या विविध भागांमध्ये होणारे स्थलांतर थांबेल, अशी अपेक्षा होती. मात्र ही आशा आता मावळताना दिसत आहे.
शासनाकडून एमआयडीसी निर्मितीसाठी ठोस उपाययोजना होत नसून, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि शासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. ही जमीन आजपर्यंत केवळ कागदावरच असून, त्याचे प्रत्यक्षात एमआयडीसीत रूपांतर होण्याची प्रक्रिया अद्यापही सुरू झालेली नाही. परिणामी, तालुक्यातील बेरोजगार रोजगाराच्या शोधात भटकत आहेत.
सरकारी आदेश
अकोला उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशानुसार मौजे पिंपळशेंडा शिवारातील गट क्र. ११३ मधील ९.४९ हेक्टर आर जमीन लघु उद्योग क्षेत्रासाठी (एमआयडीसी) संपादित करण्यात आली होती. संपादनाचा अंतिम फेरफार १९ ऑगस्ट २०१७ रोजी झाली. तथापि, या जमिनीचा उपयोग करण्यासाठी आवश्यक कार्यवाही मात्र अद्याप झालेली नाही.
अमोल जामनिक वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ता बार्शीटाकळी तालुका

19 ऑगस्ट २०१७ रोजी झाला होता जमीन संपादनाचा अंतिम फेरफार मात्र, या जमिनीचा उपयोग एमआयडीसी निर्मितीसाठी अद्यापही झाला नाही.
- प्रशासनाकडून ठोस प्रयत्न नाहीत
बार्शीटाकळी तालुक्यात रोजगार निर्मितीसाठी ठोस उपाययोजना अजूनही आखल्या गेल्या नाहीत. मागील दोन दशकात बार्शीटाकळीतील अनेक सुशिक्षित बेरोजगार स्थलांतर करत आहेत. त्यांना कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ठिकठिकाणी मजुरीसाठी जावे लागते. तालुक्यातील लोकसंख्या ५० हजार असून, औद्योगिक वसाहतीला चालना देण्यासाठी प्रशासनाने योग्य पावले उचलावीत.



