
अकोला:- वंचित बहुजन आघाडीने अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाबाबत निर्णय घेतला असून अकोला पश्चिमचे अपक्ष उमेदवार हरीश अलीमचंदानी यांना पाठिंबा दिला असल्याचे जाहीर केले आहे. नुकतेच वंचित बहुजन आघाडीने पत्रक काढले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा झालेला निर्णय पाहता वंचित बहुजन आघाडीने आता माजी नगराध्यक्ष हरीश अलीमचंदानी यांना पाठिंबा द्यायचा असं एकमत केलं आहे. या संदर्भातील अधिकृत घोषणा वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आली आहे.


