वर्धा जिल्हा प्रतिनिधी: – युसूफ पठाण
महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटना, भगवती व्यायाम प्रसारक मंडळ मोठी आंजी आणि वर्धा जिल्हा पासींग व्हॉलीबॉल असो यांच्या संयुक्त विद्यमाने आंजी मोठी जिल्हा वर्धा येथे दिनांक 7 फरवरी ते 9 फरवरी 2025 ला राज्य व्हॉलीबॉल संघटनेच्या 45 वी सब ज्युनियर राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा (मुले व मुली) अत्यंत सुरळीत व सुव्यवस्थित पार पडल्या स्पर्धेचे उद्घाटन दिनांक 7 फरवरी रोजी मा.माजी खासदार रामदासजी तडस यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये आणि मा. विजय जी डांगरे अध्यक्ष महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन यांचे अध्यक्षतेखाली तसेच वर्धा जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सुनीलजी डफाट व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सोहळा सुनियोजितपणे सुरळीत पार पडला या स्पर्धेला भाजपा चे लोकप्रिय आमदार श्री बकाने साहेब यांचे आर्थिक पाठबळामुळे या स्पर्धा लोकाभिमुख झाल्यात या स्पर्धेत महाराष्ट्रातील आठही विभागाच्या मूले व मुलींच्या संघांनी भाग घेतलेला होता आंजी ग्रामपंचायत असलेल्या ग्रामपंचायतीच्या मैदानावर दोन राष्ट्रीय दर्जाचे मैदाने तयार करण्यात आली होती मैदानावरती अत्यंत प्रकाशित प्रकाशझोतामध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या स्पर्धा साखळी आणि बाद पध्दतीने घेण्यात आल्यात स्पर्धेचे बक्षीस वितरण दि 9 फेब्रुवारी रोजी शिस्तबद्ध स्वरूपात संपन्न झाले
या स्पर्धेचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धाची भगवती व्यायाम प्रसारक मंडळाला जीम्मेदारी दिलेली होती त्याप्रमाणे त्यांनी सर्वच व्यवस्था सुरळीत सुनियोजित पणे सर्व सदस्यांनी तसेच वर्धा जिल्हा पासिंग व्हॉलीबॉल चे सर्व पदाधिकारी यांचे सहकार्याने अतिशय मेहनत करून स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला राज्य व्हॉलीबॉल संघटनेनी सर्वोतोपरी सहकार्य केले व अति अल्प वेळात ही स्पर्धा यशस्वी केली या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे या लहानशा गावामध्ये कुठलेही हॉटेल्स लॉर्जेस,राहण्याचे ठिकाण नसतानाही ग्रामीण भागातील व्हॉलीबॉल प्रेमींच्या घरी त्यामध्ये श्री भावरकर साहेब यांनी आपल्या घरचे रूम्स खाली करून दिल्या व इतरही ठिकाणी गावांमध्ये रूम खाली करून दिल्या व त्या ठिकाणी राज्य व्हॉलीबॉल संघटनेचे पदाधिकारी सदस्य पंच यांची व्यवस्था करण्यात आली व्यवस्थेसंबंधी सांगताना त्यांच्याकडे जसे काही लग्नाचे पाहुणे आले होते वर पक्षाचे जसे स्वागत करण्यात आले त्याचप्रमाणे स्वागत करताना निदर्शनास आले खेळाडूंची राहण्याची व्यवस्था ग्रामपंचायतच्या हॉलमध्ये तसेच हॉलमध्ये करण्यात आलेली होती जेवणाची उत्तम सोय ,मैदानावरची सर्व सोय आणि खास म्हणजे मैदानावरील जे लहान व्हॉलीबॉल खेळाडू होते कार्यकर्ते होते त्यांनी ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अतिशय मेहनत घेऊन ही स्पर्धा यशस्वी केली या स्पर्धेसाठी पंचमंडळाचे सर्व पंचांनी योग्य निर्णय दिल्यामुळे कुठलीही तक्रार आलेली नाही एकंदरीत स्पर्धा सुव्यवस्थित पार पडल्या आणि स्पर्धा संयोजक श्री पराग काळे यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत सुंदर या स्पर्धा घेतल्यामुळे सर्व गावांमध्ये आणि महाराष्ट्रातून आलेल्या सर्व खेळाडू त्यांचे प्रशिक्षक कोच आणि पदाधिकारी यांनी खूप खूप कौतुक केले आहे आणि आंजी गावातील सर्व व्हॉलीबॉल प्रेमींना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन त्यांना पुढील वर्षी पुन्हा अशा स्पर्धा आयोजित करण्यासाठी त्यांना प्रेरित करताना सहकार्य देण्याचे मान्य केले आहे। स्पर्धेत मुलांमध्ये १)लातूर विभाग२)पुणे विभाग३) नाशिक विभाग मुलींमध्ये:- १)पुणे विभाग २)कोल्हापूर विभाग ३) लातूर विभाग राहीले विजयी चमूनेचे अभिनंदन तसेच आयोजक व आयोजकांनी वेळोवेळी सहकार्य करणारे सर्व लहान थोर यांचे अभिनंदन…


