कैलासराजे घरत खारपाडा पेण प्रतिनीधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेत पेण तालुक्यातील खारसापोली गावचे सुपुत्र “कु. संकेत दिनकर म्हात्रे”यांची महसूल सहायक(लिपिक टंकलेखक)पदी निवड झाली आहे.यामागे त्यांनी केलेली मेहनत सार्थकी लागली आहे. त्यासाठी सर्व कुटुंबीय आई सौ.मंदा दिनकर म्हात्रे, वडील श्री.दिनकर म्हात्रे, भाऊ सिद्धेश म्हात्रे, वहिनी सौ.संपदा म्हात्रे, बहीण व भावजी सौ.कीर्ती सचिन ठाकूर यांचे मोलाचे योगदान आहे.
आपल्या यशाचे श्रेय ते आपल्या कुटुंबियांना, शिक्षकांना आणि मित्र परिवाराला देतात. प्रत्येक आई वडिलांचे एक स्वप्न असते आपला मुलगा सरकारी अधिकारी असावा. त्याने समाजात एक चांगले स्थान निर्माण करावे. ते स्वप्न आज सर्वांच्या आशीर्वादाने पूर्ण झाले.कु.संकेत दिनकर म्हात्रे यांची शैक्षणिक पार्श्वभूमि पाहता सिव्हिल इंजिनियर डिग्री घेतली असून त्यांचे मन त्यात रमेना शेवटी त्यांचे ध्येय त्यांना खुणावत होते की मला महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षा द्यायची आहे.
सरकारी अधिकारी बनायचे आहे आज त्यांनी ते आपल्या मेहनतीच्या जिवावर पूर्णत्वास नेले. आपल्याजवळ एक निश्चित ध्येय असेल आणि प्रामाणिकपणे सातत्य ठेवून अभ्यास केला तर यश निश्चित प्राप्त होते. याचे एक उत्तम उदाहरण आपल्यासमोर आहे.त्यांना मिळालेल्या या यशाबद्दल उंबर्डे जांभळे मामा परिवार, सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र भूषण आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार विजेते पत्रकार श्री.कैलासराजे निर्मला कमलाकर घरत यांनी देखील त्यांचे तोंडभरून कौतुक केले आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच पेण तालुक्यातील सामाजिक, राजकीय, कला क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, खारसापोली ग्रामस्थ, मित्रपरिवार यांचेकडून त्यांच्यावर अभिनंदनासह शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


