अकोला प्रतिनिधि गणेश वाडेकर

सिटी कोतवाली पोलिस स्टेशन हद्दीतील भाटे क्लब मैदानात छापेमार कारवाई करून तीन आरोपींकडून ५ किलो ४१५ ग्रॅम अमली पदार्थ गांजाचा साठा हस्तगत केला आहे. या कारवाईत एकूण २ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात आली आहे. अब्दुल जुबेर अब्दुल नजीर (३८) रा. पोळा चौक, नवाबपुरा जुने शहर अकोला, मोहम्मद फैज नासीर शेख (२५) रा. नर्गीस दत्त नगर, रेक्लेमेशन मुंबई रफिक कुरेशी नर्गीस दत्त नगर, रेक्लेमेशन मुंबई बांद्रा अशी आरोपींची नावे आहेत.

