सातारा
माण तालुका प्रतिनिधी:- निलेश कोकणे
महा विकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार श्री प्रभाकरजी घार्गे साहेब यांचा प्रचार दौरा जोमाने माण खटाव मतदार संघात सुरु असून त्यांच्या गावभेटी. कोपरा सभा यांना अतिशय चांगला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.माण खटावच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही बांधील आहोत. माण खटाव सुजलाम सुफलाम करण्याचे स्वप्न आम्ही पूर्ण करून दाखवू. शैक्षणिक क्रांती. औधोगिक क्रांती. सुधारित हरित क्रांती. सुसाज्ज.असे माण खटाव साठी हॉस्पिटल. क्रीडासंकुल. असे असंख्य विकासाचे मुद्दे पूर्ण करण्यासाठी जनतेला आवाहन करण्यात येत आहे.जनतेचा वाढता कल महा विकास आघाडीला दिसू लागला आहे त्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. वरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे.राष्ट्रवादीची संपूर्ण टीम आपल्या उमेदवार विजयी व्हावा या अनुषंगाने जोमाने काम करत आहे. यावेळी माण खटाव मध्ये सत्ता परिवर्तन करायचीच असा चंग मनाशी बांधला आहे. गट तट बाजूला ठेऊन सर्वजण श्री प्रभाकर घार्गे यांचा प्रचार करत आहेत.