माण तालुका प्रतिनिधी:- निलेश कोकणे
श्रीराम जप संकुल 24 वे राज्यस्तरीय अखंड श्री राम नाम जप सेवा दहिवडी येथे संपन्न होत आहे.
माण तालुक्यातील तीर्थ क्षेत्र गोंदवले हे श्रीराम परम भक्त श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर यांची समाधी असलेले संपूर्ण भारतभर एक प्रसिद्ध धार्मिक संस्थान म्हणून खूप प्रसिद्ध आहे. अखंड राम नाम. काकड आरती.भजन. कीर्तन.दोनीही वेळचा महाप्रसाद. निवासी व्यवस्था ही अगदी निशुल्क ( मोफत ) असते.जिथे माझे राम नाम तिथे माझे प्राण असे श्री महारांचे बोध वचन आहे.संपूर्ण वर्षभर असंख्य भक्तांची वर्दळ येथे सतत चालू असते.

संपूर्ण महाराष्ट्रभर अखंड जप संकुल कार्यक्रम चालू असतो.
यावर्षी दिनांक 8/9/10 नोव्हेंबर 2024 रोजी दहिवडी येथे राज्यस्तरीय श्रीराम जप शिबीर दहिवडी येथे आयोजित करण्यात आले आहे.काकड. आरती.कीर्तन. भजन. गायन.महाप्रसाद इत्यादी उपक्रम राभविण्यात येत आहेत तरी सर्व भक्तांनी याचा लाभ घ्यावा आणि सेवा करावी असे आवाहन करण्यात आले आहे 🙏🙏🚩🚩जय श्री राम 🚩🚩🙏🙏

