अमरावती प्रतिनिधी: – ज्योत्स्ना करवाडे
10 जानेवारी रोजी शिर्डीत हॉटेल शांती कमल ला भव्य साई कला गुणगौरव राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार सोहळा ओम साई विकास प्रतिष्ठान व बी .बी .सी .फिल्म यांच्या संयुक्त विद्यमाने साई कला गुणगौरव पुरस्कार 2025 या पुरस्काराकरिता अध्यक्ष माननीय श्री सुदाम संसारे पुरस्कार सोहळा समितीद्वारे डोंबिवली येथील सुप्रसिद्ध मराठी कलाकार विशाल ताटके यांची साई गुणगौरव नमस्कार 2025 निवड करण्यात आली आहे.

विशाल ताटके यांनी भाग्य दिले तू मला, जय जय स्वामी समर्थ ,शुभविवाह, सुख कळले ,प्रेमास रंग यावे, सौ प्रताप मानसी सुपेकर, पसंत आहे मुलगी ,तुला शिकवीन चांगला धडा, दुर्गा, शिवा, राणी मी होणार, आदिशक्ती, तुझेच गीत गात आहे ,ठरलं तर मग, अबोल प्रीतीची अजब कहानी, पुन्हा कर्तव्य आहे ,तू भेटशी नव्याने. या मराठी सिरीयल मध्ये काम केले असून पांडू, वाळवी, फुलवंती या चित्रपटात काम केले आहे.

पुरस्कारा निवडीबद्दल विशाल ताटके यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे पुरस्कार निवडीबद्दल विशाल ताटके यांनी साई गुणगौरव पुरस्कार समितीचे आभार यांनी मानले.

