अकोला प्रतिनिधी :- गणेश वाडकर…

सिव्हिल लाइन पोलिस स्टेशन हद्दीतील मोठी उमरी परिसरातील उच्चभ्रू भाग असलेल्या आसोलकार वाडी येथे एका भाड्याच्या खोलीमध्ये घरगुती मेसच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची खात्रीलायक माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने स्थानिक नागरिकांनी दोन महिला व चार पुरूषांना ताब्यात दिले. या प्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी कारवाई केली. शहरातील मोठी उमरी परिसरातील आसोलकर वाडी येथील एका भाड्याच्या खोलीमध्ये घरगुती मेसच्या नावाखाली गेल्या अनेक महिन्यांपासून देहविक्रीचा व्यवसाय सुरू होता.पुढील तपास पोलीस अधिकारी करत आहेत.

