धुळे :- प्रतिनिधी मा.अप्पर तहसीलदार वैशाली हिंगे मॅडम व मा.शोभा बाविस्कर मॅडम उप आयुक्त म.न.पा ( नोडल अधिकारी स्वीप पथक ) यांच्या मार्गदर्शनाखाली काल दि.08/11/2024 रोज सिद्धेश्वर हॉस्पिटल गणपती रोड धुळे तसेच शनि मंदिर चौक रिक्षा स्टॉप देवपूर धुळे येथे मतदान जन जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपला संविधानिक मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन करण्यात आले .सदर कार्यक्रमांस नागरिकांचा मोठया प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. सदर कार्यक्रमास sweep टीम चे मुक्ता आदिवासी महिला बहुउद्देशीय संस्था धुळे अध्यक्षा डॉ. मोनिका शिंपी, व संस्थेचे आदी सदस्य उपस्थित होते.💐💐💐💐