यवतमाळ जिल्हा प्रतिनीधी :-कैलास कोडापे
दहेगाव ता. राळेगाव जि.यवतमाळ येथील श्रीमती रेणुकाबाई देशमुख विद्यालय येथे दि.26 /01/ 2025 ला प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री. राजेश भोयर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे श्री. रुपेश चटकी, श्री. मनोज पाउनकर हजर होते. कार्यक्रमाला श्री. बबनराव झाडे,श्री.अंबादासजी झाडे, पालक वर्ग, गावातील तरुण मंडळी, माजी विद्यार्थी उपस्थित होते.प्रजासत्ताक दिनानिमित्त भारताच्या संविधानाचे पूजन करण्यात आले.
तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी व राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. यवतमाळ यांच्या निर्देशाप्रमाणे स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत विद्यार्थ्यांची प्रतिज्ञा घेण्यात आली.देशभक्तीपर गीत, भाषणे व नृत्य सादर करून विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुकर परचाके यांनी केले तर आभार प्रदर्शन मधुकर मुसळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मते मॅडम,रिंगणे मॅडम,प्रवीण आगलावे, विलास बोधे यांनी परिश्रम घेतले.


