पियूष गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
एटापल्ली – भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय एटापल्ली येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालय विकास समितीचे सदस्य श्री. दत्तात्रय सावकार राजकोंडावार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

ध्वजारोहणाचे संचालन शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. डाॅ. संदीप मैंद यांनी केले. याप्रसंगी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली आंतरमहाविद्यालयीन व्हाॅलीबाल स्पर्धेत अजिंक्यपद पटकाविलेल्या चमूतील महाविद्यालयाचे खेळाडू अक्षय गोटा व यश झाडे यांचे आंतर विद्यापीठ वेस्ट झोन व्हाॅलीबाल स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल तसेच आल इंडिया आंतर विद्यापीठ युथ फेस्टिवल वेस्ट झोन मध्ये निवड झालेल्या कु. रोशनी कंगाली, कु.विना गावडे व सचिन गावडे यांचे प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डाॅ. बाळकृष्ण कोंगरे यांनी केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. संभाजी हिचामी, डॉ. आसूटकर, सामाजिक कार्यकर्त्यां सौ. पोर्णिमा श्रीरामवार, श्री. शशांक दहागावकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस. एन. बुटे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. धनंजय पोटदुखे, प्रा डाॅ संदिप मैंद, प्रा. डाॅ. विनोद पत्तीवार, प्रा. डॉ शरदकुमार पाटील, प्रा. डाॅ विश्वनाथ दरेकर, प्रा. निलेश दुर्गे, प्रा. डाॅ राजीव डांगे, प्रा. डाॅ. श्रृती गुब्बावार, प्रा. राहुल ढबाले, प्रा. चिन्ना पुंगाटी प्रा. भारत सोनकांबळे, प्रा. डॉ साईनाथ वडस्कर, प्रा. अतुल बारसागडे,प्रा. सविता भांडेकर, श्री. शेख सर, श्री. राजूरकर सर, प्रा. झिलपे, प्रा. घोंगडे तथा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.


