अकोला विभाग प्रतिनिधी गणेश वाडेकर
तेल्हाराः हिवरखेड पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार २३ जानेवारीला झरीबाजार येथून येणाऱ्या खाजगी लक्झरी क्र. एमपी ५० पी ११६८ च्या चालकाजवळ एक पिस्तुल व चार जिवंत काडतुसे राउंड आढळून आल्याची खळबळजनक घटना हिवरखेड पासून एक किमी अंतरावर घडली. या प्रकरणी लक्झरी चालकास अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून ४ लाख ५० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अशी माहिती आज 25 जानेवारी रोजी हिवरखेड पोलिसांनी दिली. या प्रकरणी अधिक तपास पोलिस स्टेशनचे ठाणेदार
तपास पोलीस करीत आहे.


