वर्धा प्रतिनिधी
बंद असलेल्या घरातचोरट्यांनी संधी साधत घरात प्रवेश करीत २० हजारांची रोख चोरून नेली. ही घटना हिंगणघाट येथील संत तुकडोजी वॉर्ड येथे कल्पना बाबाराव भिसे (५२) यांच्या घरी घडली. याप्रकरणी दाखल तक्रारी वरून हिंगणघाट पोलिसात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद केला. कल्पना भिसे या त्याच्या कुटुंबियांसह कामानिमीत्त बाहेरगावी गेल्या होत्या. दरम्यान भांडे घासण्यासाठी आलेल्या महिलेला तिच्या घराचे मागचे दार उघडले दिसून आले. घटनेची माहिती घरमालकाला दिली.