पियूष गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनीधी
- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी निवेदन देताना
देवेंद्रजींपुढे प्रश्न मांडण्याचा सहपालकमंत्र्यांनी दिला विश्वास!
गडचिरोली: राज्यातील युवकांना रोजगार मिळावा यासाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली होती. यातून अनेकांच्या हाताला काम मिळाले. परंतु प्रशिक्षणार्थींचा निहित कालावधी सहा महिन्यांचा असल्याने त्या पुढे काय हा प्रश्न त्यांच्यासमोर असून या प्रकरणी गडचिरोली जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थींनी शनिवारी (दि.२५) जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांची भेट घेऊन जिल्ह्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण संघटनेच्या वतीने निवेदन दिले.
सदरील २७ प्रशिक्षणार्थी हे जिल्ह्यातील शासकीय आस्थापनेवर काम करत आहेत त्यांचा कार्यकाल १६ फेब्रुवारी २०२५ रोजी पुर्ण होत आहे त्याकरिता हि योजना कायमस्वरूपी चालू राहावी, व आमचा कार्यकाल संपुष्टात येण्यापूर्वी येण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून जीआर काढावा, आपले सरकार सहा महिन्यांपूर्वी रोजगार दिलेल्या प्रशिक्षणार्थी विध्यार्थ्यांना बेरोजगार करू नये, अशी संघटनेच्या वतीने निवेदन देऊन विनंती करण्यात आली.
सहपालकमंत्री ॲड आशिष जयस्वाल यांनी प्रशिक्षणार्थींशी सविस्तर चर्चा करून त्यांची मागणी मुख्यमंत्री महोदयांकडे करणार असल्याचा यावेळी विश्वास दिला.
- यावेळी निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष दशरथ कोवे, सचिव पंकज नैताम, अंकित पितुळवार, दर्शना सोरते, नागेंद्र बारसागडे यांच्यासह प्रशिक्षणार्थी उपस्थित होते


