पुसद शहर प्रतिनिधी :- अनिल पवार
पुसद : पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या गायमुख नगर ग्रामपंचायतीच्या हददीतील मधूकर नगर येथे सन २०२३ – २४ खासदार फंडातून सिमेंट कॉग्रेट रस्ताचे करण्यात आलेले हे काम कंत्राटदाराने अंदाजपत्रका प्रमाणे न करता निकृष्ट दर्जाचे साहित्य नाममात्र सिमेंट व डस्ट चा वापर करून थातूरमातूर केले असल्याने या सिमेंट काँग्रेट रस्त्याच्या कामाची गुणनियत्रण विभागामार्फत सखोल चौकशी करून या कामाची देयके अदा करू नये

या रस्त्याच्या भष्ट्राचार प्रकरणी सरपंचला पदमुक्त करून ग्रामसेवक व शाखा अभियंता यांना बडतर्फ करावे व कंत्राटदाराला काळया यादीत टाकावे उपोषण दरम्यान उपोषण कर्त्याला जिवित्वास कोणतीही हाणी झाल्यास यास संबंधित सरपंच ग्रामसेवक अभियंता व कत्राटदार तसेच शासन प्रशासन जबाबदार राहतील असे यावेळी उपोषण कर्ते मारोतराव कांबळे मधूकर नगर पुसद यांनी महाक्रांती न्युज 24 (आवाज जनेतेचा) पोर्टल शी बोलताना सांगितले….
