पियुष गोंगले: – गडचिरोली जिल्हा प्रतिनीधी
दि. 23/01/2025 रोजी मकर संक्रांती निमित्त असरल्ली येथे हळदी – कुंकूच कार्यक्रम आयोजित केला. यात आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम व त्यांची सूनबाई डॉ. मितालीताई यांच्या तर्फे “पर्यावरण रक्षणाची धरा कास, तरच होईल मानवाचा विकास” अस शुभसंदेश देत आपल्या लाडक्या बहिणींना रोप वाटप करण्यात आले. व डॉ. मितालीताई आत्राम आपल्या लाडक्या बहिणीसोबत मनोरंजन करीत वेगवेगळ्या विषयावर चर्चा केली व मार्गदर्शन करीत त्याच्या शुभ हस्ते कार्यक्रम आटोपण्यात आला.


