यवतमाळ जिल्हा प्रतिनीधी: – कैलास कोडापे
पत्रकार संरक्षण समिती,महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विनोद पत्रे यांच्या पत्रकारितेतील उत्कृष्ट कार्याची दखल घेत 23 जानेवारी(गुरुवार)रोजी गव्हर्मेंट रेस्ट हाऊस,यवतमाळ येथे सोशल ऍक्टिव्हिस्ट व पत्रकारांच्या वतीने त्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला.

या विशेष प्रसंगी सोशल ऍक्टिव्हिस्ट,कॉम्रेड,दलित पॅंथर सचिन मनवर,दैनिक सहासिक वृत्तपत्राचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी दीपक यंगड,एन.टी.व्ही व कारा या इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जिल्हा प्रतिनिधी कलीम खान, गुरुदेव सेवा संघाचे मनोज गेडाम, दैनिक अग्नी मराठीचे प्रफुल मेश्राम,प्रा.पंढरी पाठे,तसेच रेस्ट हाऊस मधील कर्मचारी उपस्थित होते.या सन्मानाने पत्रकारिता क्षेत्रातील त्यांचे योगदान अधोरेखित झाले असून,समाजहितासाठी कार्यरत असलेल्या पत्रकारांच्या प्रेरणादायी भूमिकेला चालना मिळाली आहे.



