यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी :-कैलास कोडापे
कै. बालाजीपंत चोपणे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बोटोणी येथे नेताजी सुभाष चंद्र बोस जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला . या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. सुभाषराव वरारकर सर आणि प्रमुख अतिथी म्हणून सत्कारमूर्ती प्राध्यापक पुरुषोत्तम येरेकर त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून सौ.छाया बुटले मॅडम , श्री. अरविंद बोढे सर हजर होते. या कार्यक्रमात नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना शाळा नायक कृष्णा आत्राम व देवयानी, धोटे या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले.
त्याचबरोबर धाराशिव येथे दिनांक 12./1./2024 रोजी राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधुन व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालयातील खासदार प्रमोद महाजन सांस्कृतिक सभागृह धाराशिव येथे स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ आणि मंत्रालय समन्वय समिती मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा.पुरुषोत्तम येरेकर सर यांना महात्मा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने,” सन्मानित करण्यात आले होते.
राज्यभरातील सामाजिक व शैक्षणिक कार्यामध्ये अग्रेषित असणाऱ्या प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांना गौरविण्यात आले आहे होते. प्राध्यापक पुरुषोत्तम येरेकर यांचे सामाजिक व शैक्षणिक संघटिक कार्य नाविन्यपूर्ण होते आणि आजही त्यांचे कार्य नियमित, अविरत चालू आहेत याच कार्याची पावती त्यांना सामाजिक शैक्षणिक कार्याचे मूल्यमापन म्हणून कार्यक्रमांचे अध्यक्ष प्रा.ड्रॉ. बापूसाहेब आडसूळ यांच्या शुभ हस्ते राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

त्यांनी केलेले शैक्षणिक व सामाजिक, संघटन कार्याला प्रोत्साहन देत कै. बालाजीपंत चोपणे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथील प्राचार्य श्री. सुभाषराव वरारकर सर यांनी आपल्या विद्यालयात प्राध्यापक पुरुषोत्तम येरेकर यांचा दिनांक -23 /1 /2025 रोजीला शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. आपल्या विद्यालयाचे महाराष्ट्रात नाव लौकिक करत राहावे आणि श्री. येरेकर सरांनी शैक्षणिक क्षेत्रात आणखीन प्रगती करावी असे प्रोत्सांपर आपल्या अध्यक्षीय भाषणातून सांगितले. या कार्यक्रमाला श्री.श्रीकांत गोहोकार सर, श्री.रवींद्र मेश्राम सर, कु.भारती गायकवाड मॅडम,श्री. शरद घागी सर तसेच श्री. गणेश भाऊ चोपणे आणि , बदखल मॅडम, श्री. विनोदभाऊ देवाळकर, श्री.विलास चोपणे लीलाधर गाणफाडे, विमलताई चोपणे उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री . विरुटकर सर आणि आभार प्रदर्शन कु. भारती गायकवाड मॅडम यांनी केले

