बुलढाणा जिल्हा प्रतिनीधी: – सुनील वर्मा
लोणार : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ९९ वी जयंती, रूग्णांना ब्लॅंकेट तथा फळांचे वाटप, गोंड वैदू महिलांना साडीचे वाटप, विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप अशा विविध समाज उपयोगी उपक्रमाने शिवसेना उ. बा. ठा. चे आमदार मा. सिद्धार्थ खरात जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछीरे त्यांच्या नेतृत्वात तालुका व शहराच्या कार्यकारणी कडून साजरी करण्यात आली.

शिवसेना भवन लोणार येथे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून नंतर शासकीय रुग्णालय येथील रुग्णांना ब्लॅंकेट व फळांचे वाटप, वैदू गोंड महिलांना साडीचे वाटप करण्यात आले, नगरपालिकेची उर्दू शाळा व जिल्हा परिषद ची प्राथमिक शाळा येथील १२०० विद्यार्थ्यांना बिस्कीट तथा खाऊचे वाटप करण्याचे नियोजन शहर प्रमुख गजानन जाधव यांनी केले,

याप्रसंगी जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछीरे लुकाप्रमुख एड. दीपक मापारी शहर प्रमुख गजानन जाधव, महिला जिल्हा उपप्रमुख संजीवनी वाघ, नगरसेविका सिंधुताई जाधव, तालुका संघटक कैलास अंभोरे, शहर उपप्रमुख लुकमान कुरेशी, शहर संघटक तानाजी मापारी

युवा शहरप्रमुख श्रीकांत मादनकर, विभाग प्रमुख तानाजी अंभोरे, योगेश भुक्कन, अल्पसंख्यांक तालुकाप्रमुख सय्यद उमर, शहर प्रमुख इकबाल कुरेशी, सुदन अंभोरे, गजानन कोकाटे, ज्ञानेश्वर दूधमोगरे, हमीद कुरेशी समर्जित बछीरे, शुभम मोरे, रामेश्वर पठ्ठे, विष्णू तनपुरे, विठ्ठल ढेंबरे आदी शिवसैनिक उपस्थित होते.



